पंख दिले झेप घेण्यास
पंख दिले झेप घेण्यास
विस्कटलेलो सगळा
वाटलेलं संपवावं स्वतःला
साथ नव्हती कोणाची
धीर देत होतो मनाला
संकटही पाहत होती माझा अंत
त्यांची स्फूर्ती भिडत होती जीवास
पण आता मी नव्हतो बसणार शांत
पंख दिले झेप घेण्यास
गगनाला घालायची होती गवसनी
पण पराभवानेच पंक छाटलेलं
आकांक्षा बाळगत होतो मनी
आठवू लागलं पूर्वी मृत्यूलाही धमकावलेलं
एक ध्येय वेडा प्रवास होता
प्रेरणा देत होते जगण्यास
आता वेळ थांबायची नाही
पंख दिले झेप घेण्यास
