पळस
पळस
सरतात ऋतु मागून ऋतु
सृष्टीचक्र बदलतात निसर्गाची
नवी पालवी देई वार्ता बहरणाऱ्या वसंताची
आला हा वसंतोत्सव वृक्ष वेलींचा
गर्द केशरी लाल रंगाचा साज लेऊनी
बहुगुणी पळस बहरला
जणू साजरा करण्यास
नवा जन्मोत्सव धरतीचा
रखरखत्या उन्हात नवचैतन्य याचे
शिकवूनी जाई
नसते कधी खचायचे
जरी गळाली पर्ण
संकटाला सदैव तोंड द्यायचे
अन् नव्याने फुलायचे....
बहरणे गळून पडणे
गळणे नव्याने बहरणे....
हे निसर्गाचे चक्र निरंतर चालायचे...
