STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics

2  

Jyoti gosavi

Classics

पळणारा डिसेंबर

पळणारा डिसेंबर

1 min
57

तारखांच्या जिन्यातून

 पळणारा तो डिसेंबर

 सर्वांनाच जाणवतो फक्त

 डिसेंबर मध्ये 


बाकी वर्षभर चालूच

 असते खोडी कुरघोडी

 आणि कित्येक घडामोडी 

एकमेकांच्या तंगड्या ओढी 

 

जिंकण्याची लागते होड

 त्यासाठी सुंदोपसुंदी

 कधी शब्दाने, कधी शस्त्राने

 कधी विश्वासघात तर 

 कधी तोडफोड


 वर्षभर का लक्षात घेत नाही? 

यातले काही चेहरे वजा होतील

 अरे काल परवा तर भेटलो होतो 

आज मात्र ते मातीत असतील


 तेव्हा होते सारे निष्फळ

 हातात उरते फक्त हळहळ

 म्हणून ठेवा आपले मन निर्मळ

 अहो हा हा म्हणता जातील पळ


 पैसा मान मरातब सारे

 तर येथेच राहणार

 प्रेमाने बांधलेली शिदोरी

 फक्त तुमच्या बरोबर येणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics