STORYMIRROR

Shital Yadav

Tragedy

3  

Shital Yadav

Tragedy

प्लॅस्टिकचे विष

प्लॅस्टिकचे विष

1 min
27.4K


वाढती लोकसंख्या वाढे गरजा

समाजात वाढे पर्यावरण ऱ्हास

वाढे इथे प्लॅस्टिकचे दुष्परिणाम

निसर्ग संवर्धनाचा घ्यावा ध्यास


प्लॅस्टिकमय झाले अवघे जगणे

नैसर्गिकता आता लोप पावली

प्लॅस्टिकची झाडेपाने, फुले,फळे

प्लॅस्टिक वस्तूंनी जागा व्यापली


शेतकऱ्याची दीन झाली अवस्था

प्लॅस्टिकजाळीने शेती निकृष्ट होई

मशागत केल्यावर शेतमाल नाही

सकसता काळ्या धरणीची जाई


हजारो टनाने प्लॅस्टिकचा कचरा

गुराढोरांना रोज मृत्युमुखी पाडतो

कितीतरी पटीने जलचर जीवांना

प्लॅस्टिकचे विष यमलोकी धाडतो


प्लॅस्टिकच्या अधीन आज माणूस

वाढली गंभीर समस्या समाजात

कापडी पिशवीचाच वापर करावा

तरच स्वच्छता राहील परिसरात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy