STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

4  

Kishor Zote

Tragedy

प्लास्टिकमुळे जीवन हळूहळू जळे

प्लास्टिकमुळे जीवन हळूहळू जळे

1 min
254

जळे वनवा जंगलात

जंगलात घडे प्रदुषण

प्रदुषण बिघडवी स्वच्छ हवा

हवा सजीव तीच करे श्वसन


श्वसन करताना वास येतो

येतो प्लास्टिक जळण्याचा

जळण्याचा कोळसा झाला

झाला ना नाश त्या प्लास्टिकचा


प्लास्टिकचा विळखा वसुंधरा

वसुंधरा श्वास गुदमरला

गुदमरला प्रवाह पाण्याचा

पाण्याचा वास नासलेला


नासलेला प्रकार प्लास्टीकचा

प्लास्टिकचा वापर कमी व्हावा

व्हावा वापर कापडी पिशवीचा

पिशवीचा वापर सर्वत्र दिसावा


दिसावा उदयाचा दिवस नवा

नवा नवेपणा सगळयांनाच हवा

हवा, पाणी, धरणी सर्वच स्वच्छ

स्वच्छ निर्मळ सारा निसर्ग व्हावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy