पलाश
पलाश
फाल्गुन मास येता
करिती कूजन पक्षी..
बघा वृक्ष पलाश
ल्यायला केशरी नक्षी..
प्रभात समयी त्यावर
पडती रवीची किरणे...
हिरव्या पानांच्या आडून
डोकावे केशरी तराणे...
येता ऋतुराज वसंत
गाई कोकीळ गाणी...
कुहुकुह
ू कूजन करुनी
घेती मधुघट रीचवूनी...
वृक्षराज पलाश विरक्त
त्यागतो मग पर्णभार..
भगभगत्या शिशिर झळांना
झेलतो केशरी बहार...
हे रूप दिव्य पलाशाचे
मोहवे खरे मनास..
दिव्य तपस्वी ऋषीचा
तयात होतसे भास...