STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational

4  

Ramkrishna Nagargoje

Inspirational

पिता

पिता

1 min
291

हा पर्वत मोठा,

कणखर दणगट,

वृक्षवेलीचा अधार मजबुत,

तैसा पिता हा दणगट खंबीर.


आले आले सुख भरुन

पिता माझे एकच कारण.

दु:खालाही वाटले यावे,

डाल छातीची,पुढे पिता रे.


सुखे आम्ही भोगली सारी,

दु:खा झाली पळता भुई.

व्याघ्र जसा ठोके आरोळी,

तसा माझा पिता संसारी.


ना दमला कधी,ना काढे श्वास,

दु:खी न दिसे चेहरा कधी,

श्रमसाफल्य ही झाडी हिरवी,

हसते घर फुलते शेत,

हा पिता आधार संसारी.


कधी ना आले डोळ्यात पाणी,

आमचे अश्रू​ पुसले यांनी

हा पिता आमुचा सागर मोठा,

नद्या हासती यास मिळता.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational