STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

4  

Rohit Khamkar

Romance

पिरेम

पिरेम

1 min
230

अचानक गड्याचा ग, बदललाय ह्यो बाज.

रूप तूझ डोळ्यामंदी, साठलय अस आज.


एकट्याच्या दुनियेत, एकटाच जगतोया.

गालातल्या गालामंदी, हलकाच हसतोया.



दिसशील एकदा तरी, जिव हा तडफडे.

गर्दीत माणसांच्या, अचानक कडकडे.



लत कशी लागली मला, एकटाच बोलण्याची.

बसायचो आधी गप, वाट पाहे चालण्याची.



आणवानी फिरतोया, चटक्याला भान नसे.

बघन्याचे कारणही, शोधतोय तसे तसे.



झाली कधी नजरा नजर, चोरतोया माझ मला.

कोणातरी बघते लपून, कळतंय तूझ तुला.



मनाच्या या कोरडाला, फुटलाय झरा नवा.

पिरमात पडलो का, ईचारतोय कवा कवा.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance