पिकलेल्या पानाला विचारा...
पिकलेल्या पानाला विचारा...
पिकलेल्या पानाला विचारा ,
अजूनही दुःख हिरवे का ?
गळून पडले माती वरती ,
तरीही झाडाशी जवळील का ?...
बदलणाऱ्या ऋतूंचे ,
अंग अंग सोसले ,
पाण्यात भिजले की,
उन्हात हिरमुसले ...
येता पानगळ कधी ,
काळीज किती धडधडले ,
आता नको देवा ,
अजूनही काही बाकी उरले ...
पुन्हा झिरपता हिरवळ,
तन मन चकाकले ,
सांज छेडून गेली ,
रात्रभर चांदणे वेचले...
आज क्षितीजाशीच ,
काय तुझे बिनसले,
अलगद खाली येताना,
डोळे आसवांनी भरले ...