STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

फुलराणी

फुलराणी

1 min
236

फुलांवरी दवबिंदू

पहाटेच्या रम्य वेळी

लाजूनी गं फुलराणी

झूला झुलविसी राणी


रंग गंध दरवळे

सडा रश्मीकिरणांचा

साज तुझा गं फुले

सोनसळी आठवांचा


लाजलीस फुलराणी

गोडशी गं मनोमनी

निरोप रश्मीकिरणांनी

दिधला तुज चोरुनी!!


रंग गंधे बहरली

यौवनात उमलली

साक्ष प्रेमाची पटली

गाली खळी गं खुलली


प्रेमभ-या हर्षोन्मादे

नाच नाचे फुलराणी

जीवनी तुझ्या फुलू दे

गोडशी प्रेमकहाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract