फुलपाखरू
फुलपाखरू
सुरवंटाचं फुलपाखरू होतं
अन् मग रंगीबेरंगी रंग लेवून ते बागडू लागतं
इथपर्यंत सगळं ठीक असतं
पण मग ते उडून, निघून जातं
हा विचार करणं राहूनच जातं
पकडायला गेलं तर अडकवून ठेवल्यासारखं
पकडून सोडून दिलं तर
पुन्हा हाती सापडणं कठीण...
ते सोडून गेल्याचं पाणावल्या डोळ्यांनी
पाहता पाहता कळतं
त्याचे रंग आपल्या हातावर सोडून गेलंय ते...
आठवण म्हणून...
आपल्याला नेमकं काय हवं असतं?
त्याचं फुलपाखरू होताना पाहणं?
त्याचं बागडणं?
की दूर गेलं तरी जाताना ...
रंग मागे सोडून जाणं?
एका अदृश्य नाळेसकट...
