STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

5.0  

गीता केदारे

Inspirational

फुलपाखरू...

फुलपाखरू...

1 min
1.0K


.... फुलपाखरू....


सुंदर तुझ्या पंखांचे रंग

होई तुज पाहता मी दंग

फुलपाखरू ते फूलात गुंग

फुलांच्या मधुरसात धुंद... ||१||


चिमुकले ते पंख रंगीत

भिजले रंगात अगणित

भिरभिरते फुलांवर हसत

रंगाची उधळण करत... ||२||


नाजूक छोटीशी मिशी छान

डोळे दिसती मणी समान

आवडे तू लहानथोरास

भूलती तव मोहक रंगास... ||३||


फुलपाखरा तू किती छान

निळ्या जांभळ्या रंगाची खाण

पाना -फुलांवर तुझी भ्रमंती

आसमंती तव रंगसंगती ... ||४||


...© सौ. गीता विश्वास केदारे...

मुंबई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational