STORYMIRROR

Nutan Pattil

Classics

3  

Nutan Pattil

Classics

*फुलली गुलाब कळी*

*फुलली गुलाब कळी*

1 min
484

सकाळ होताच नजरेस 

पडली आज गुलाबकळी!!

भान हरवून गेले

रंगबिरंगी खूप वेगळी!!


आकर्षक रंगसंगती

सुगंध पसरे सर्वत्र!!

आसमंत प्रसन्न झाले

खुश झाले मी एकमात्र!!


 रवीकिरणांचे दर्शन झाले

फुलली मग गुलाबकळी!!

सुंदर फुलात अवतरली

नाजूक अशी ती पाकळी!!


रूप पाहुनी गुलाबाचे

मोह न आवरला!!

लगेच गुलाब माळला

आंबडा माझा सावरला!!


सौर्दयतेचे मुर्तीमंत उदाहरण

अशी ही गुलाबकळी!!

रूप पाहुन माझे मी दर्पणी

पडे गालावर खळी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics