फसलेला डाव
फसलेला डाव
खूप सुंदर गोष्ट
घडली एकदा इथे
का कुणास ठाऊक
पण गंमत झाली तिथे
गाईच्या गोठ्यात सगळे
जमले सखेसोयरे
डाव समजावून झाले
सगळे चोहीकडे पसरे
तिच्या नकळत कान्हाने
मांडला होता डाव
जाण्यास निघाली मय्या
गोपिका दाखवीत भाव
लोण्याचा गोळा घेता
हळूच कान्हा पाही
मय्याची लागता चाहूल
पळे सोयरे कान्हा तेवढा राही
कान्हाची प प होई
पाहून मय्याची आग
तिच्या नकळत केला डाव
फसला बघून मय्याचा राग