STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

फोटो

फोटो

1 min
539

हातात हात घेण्या आधी

विचार करावा लागतो

दोघांनाही दहावेळा

ती जबाबदारी पैलण्याचा


राजेशाही लग्नाचा थाट

आपल्याही लग्नाचा असावा

असे स्वःप्ने पाहात

का उगाच घालतात घाट


फोटो काढताना

होते तुम्हाला

अडगळ पाहुण्यांची

गर्दीतल्या मित्रांची


'प्री वेडिंग' च्या नावाने

आधीच नटुन थटुन

'पोझ' देत फोटो 

काढले जातात


'इवेंट मॅनेजमंट' च्या

तालावर नाचत

प्रत्येक विधीचे 

काढले जाते ' शुटिंग'


लग्न विधींचा

अर्थ न समजुन

फोटो, शुटिंगच्या

नादी लागतात


हातात हात घेऊन

काढलेले ते फोटो

सोशल मिडियावर 

व्हायरल होतात


कुठे नंतर 

काय बिनसत

कोणास ठाऊक

लग्ना आधीच लग्न मोडतं


राहतात मागे

फक्त फोटो शुटींग रूपी आठवणी 

खर्या लग्न न झालेल्या लग्नाच्या



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational