फक्त तू
फक्त तू
तुझ्या भेटीसाठी
आसुसलो मी
सांगताही येत नाही
भेटताही येत नाही।।
कधी डोळ्यात तू
प्रेम पाहिला होता
तुझा चंद्र मुखाने तो
हारलेला होता।।
वाटते तुला सगळं
सांगून जावे
तुझ्या कुशीत
दडून राहावे।।
कमलनयन डोळे तुझे
पाहताच मनी माझी
होई किलबिल तिचे
ओठ काही सांगतसे।।
तू समोर पाहिजे
सतत वाटत असते
पण हे ही संभव नाही
काय कारण असते।।
एक दिवस तू
देशील का माझ्यासवे
तीच वेळ सांग तू
काळाच्या आडासवे।।

