STORYMIRROR

Vijay Sanap

Children

3  

Vijay Sanap

Children

फजिती

फजिती

1 min
551


माकड अन् खोकडीचं

जमलं होतं लग्नं

दोघांच्या लाग्नाला

आलं भारी विघ्नं ।।


मित्राच्या लग्नाला

कोल्होबा आले

हाती चड्डी धरुन

खूप नाचू लागले ।।


जंगलातून मिरवत

निघाली होती वरात

वाजत गाजत आली

वाघोबाच्या दारात ।।


वाघोबाला पाहून

सारे लागले पळू

कोल्होबाची चड्डी

लागली होती गळू ।।


नवरदेव नवरीची

बांधली होती गाठ

पळायला नव्हती

त्यांना चांगली वाट ।।


समद्याच लग्नाची

फट फजीती झाली

सारी वऱ्हाडी मंडळी

थकून घरी आली ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children