फितूर प्रेम!
फितूर प्रेम!
आकाश ठेंगन होतं ,जेव्हा तू मला भेटतोस
छातीशी जवळ घेऊन घट्ट मला बिलगतोस
तेव्हा वाटते वार्या संगे तुझ्यासवे ,आकाशी उडत जावे
सारे सुख कवेत घेऊन ,हसत हसत जगावे
पण!
फितूर झाल्या आठवणी
आणि दिलेले वचन,भेटी
तुझ माझ प्रेम बदललं
आणि रस्तेही ,वळणे कित्ती
मनापासून सांगते तुला
तुझीच वाट बघितली होती
पण!चालताना तू हात
सोडून मोकळा धावलास
तिथेच गफलत झाली होती
आज देशिल कित्ती हाक
परतुन कशी येऊ सांग
जीवन दान दिले कुणाला
मनात तुला कशी ठेऊ सांग
फितूर तुझे प्रेम निघाले
आनाभाका साऱ्या झूठ
विरहात झुरट कशी बसू
संसार करते आता मुक

