STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

पहिलं प्रेम ...!

पहिलं प्रेम ...!

1 min
430


धुक्याची सकाळ

त्या वयातच छान असते

जेंव्हा लांबून पहिलं प्रेम

येताना दिसते


हूर हूर गडबड

आवरण सावरण

डोक्यावरून हात फिरवण

आणि आवंढा गिळण


सार अवती भवतीच विश्व

क्षणात गायब होणं

आणि आतल्या आत

प्रेमाच्या घंटा वाजण


आली आली पासून

गेली गेली प्रयन्त सारच

अचंबीत करणार आणि

उरात कायमच ठसणार


आज तसच झालं

धुकं चांगलंच पडलं

सार जसच्या तस आठवलं

खरचं खूप बरं वाटलं


म्हंटल प्रत्येकानं प्रेम

जरूर करावं

त्या प्रेमाचं गोड ओझं घेऊन

सुखाने जीवन जगावं


सफल विफल प्रश्न अलाहीजा

पण फलश्रुती इतकी गोड

अमृतही झक मारते

जेंव्हा कोठेही आठवणींना

मिळते निसर्गाची जोड ....!




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance