STORYMIRROR

Shital Yadav

Romance

3  

Shital Yadav

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
26.6K


प्रेम म्हणजे आर्त, हळवी

तरल,निरागस अशी चेतना

जिच्या शिवाय जीवनाची

कल्पनाच करता येईना ।


पहिलं प्रेम असंच अपूर्व

शब्दातीत,अरुवार असतं

तारकांनी भरलेल्या नभात

लाघवी हसरी चंद्रकोर असतं।


पहिलं प्रेम ऐसे सुखद स्वप्न

बघे जो तो मृगजळासम त्याला

पण नशीबवान मोजकेच असे

मिळे खरे प्रेम जीवनी ज्याला ।


पहिलं प्रेम पुष्प असे साजरे

ज्याचा मधुगंध मंद दरवळे

प्रीत उपवनी बहरते निस्वार्थ

पहिल्या प्रेमाचे नाते कोवळे ।


पहिलं प्रेम सुमधुर ऐसे गीत

ज्यास मनमुराद धुंदीत गावे

प्रीतीची स्वरसप्तक छेडूनी

प्रणयतराणे ओठांवरी यावे ।


पहिलं प्रेम ऐसे शाश्वत सत्य

जे रेशीमबंध असे मना मनाचे

खरी असेल जर प्रीत मनी तर

नाते घट्ट होईल आजन्माचे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance