पहिली रात्र
पहिली रात्र
पहिला प्रहर पहिली रात्र
शब्दा विना काही न कळले
ओठ जुळले ओठाशी अन
जीवनाचे गुज हळूच वळले
मध्य रात्रही गुनगुनत होती
कनात ते कुठले गुंजन
शहारले अंगअंग अन
पुलकित झाले सर्व रंजन
क्षण मुलायम ओसरत गेले
पहाट होता सारी पांगली
चांदण्यांची कोमल शीतलता
दुरुन होती मनात रांगली
नुसतेच का ते मनाचे भास
नव्हते कुणी माझ्या आसपास
श्वास होती लयीत प्याले
वाटले प्रेम कधी कुणास फास
जीवन हे नश्वर जरी
ना जगवत तुझ्या परी
ये राजसा एक अतृप्त आस
दे प्रीतीची तू आरास

