पहिली भेट
पहिली भेट
पहिली भेट माझी
माझ्या माऊलीशी
होती थोडी निरागस
पण खुप हवी-हवीशी
वाट माझ्या येण्याची
नऊ महिने तिने पाहिली होती
क्षणा-क्षणांची वेळ तिची
माझ्या साठीच तिने वाहिली होती
नाजुक माझ्या स्पर्शाने
ति किती भारावली होती
डोळ्यांत माझ्या पाहत
उद्याचे स्वप्न रंगवत होती
मायेने भरलेल्या तिच्या हातांत
तिने अलगद मला उचलले होते
छ़ोटीशी होती भेट पहिली
पण अखंड विश्वाचे दर्शन तिने घडवले होते
पहिली भेट आमुची
मुळात पहिली नव्हतीच ती
शतजन्मीची ओळख आमुची
आज नव्याने उमलली होती
