पहिला पाऊस☔🌂💦
पहिला पाऊस☔🌂💦
पहिला पाऊस अवखळ
स्वागतासाठी आतूर सारे
वाट पहायला लागे खूप
आगमनच होतं दणक्यात
उग्र कधी मनोहारी रूप
कधी येतो गर्जत वर्षत
कधी चाहूल लागत नाही
अनुभव नित्य नवे देतो
हळूवार जपण्या सारखे
कधी सर्वस्व ओढून नेतो
प्रेमींसाठी तो प्रेमवर्षाव
कवी मनाची स्फूर्ति देवता
चातकाची भागवी तहान
हर्षानंदे नाचवी मयूर
सृष्टीस्तव ठरे वरदान
