STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Inspirational Others

3  

Somesh Kulkarni

Tragedy Inspirational Others

फॅशन

फॅशन

1 min
224

फॅशनच्या नावाखाली गैरवर्तन चाललंय सगळीकडे,

कृतीआधी व्हायला हवा विचार 'काय होईल पुढे'

वाटलं नव्हतं संस्कृतीचा इतका होईल ऱ्हास,

कशी बाळगावी भारताने मूल्यांशिवाय महासत्ता होण्याची आस?


उधळपट्टी करुन कर्जबाजारी होणं कितपत रास्त?

प्रगती होण्यासाठी माणसाच्या अंगी असावी शिस्त

दाखवण्याकरता समाजाला उत्तम या जगात केवळ आम्ही,

काहीही शोधून काढतात क्लुप्त्या भन्नाट आणि नामी

थोडं राखता यायला हवं सामाजिक भान,

दुसऱ्याशी स्पर्धा करुन वाढत नसते आपली शान


क्रांतिकारकांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा करा आदर,

सिद्ध होत नाही देशभक्ती स्वातंत्र्यदिनी पांघरुन पुढारीपणाची चादर 

देशाला गरज आहे आज विचारांच्या क्रांतीची,

आयतं मिळणाऱ्याला नाहीच कळत किंमत दोन वेळच्या जेवणाच्या भ्रांतीची

करता येईल जेव्हा जनमानसांच्या ह्रदयावर शासन,

माणसातलं माणूसपण राहावं जागं तीच खरी फॅशन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy