STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

2  

Abasaheb Mhaske

Tragedy

फेक अकाउंट सारी

फेक अकाउंट सारी

1 min
13.6K


सज्जनांच्या वाट्याला सदैव उपासमारी 

भामट्याची मात्र चांगलं भारी .

माणसं उपाशी, कुत्र्यांना मात्र बिस्किटांची न्याहारी 

दुसरा काय, ज्याचं - त्याच प्रारब्ध

जगणं इथे झालयं महाग,मरण झालं स्वस्त 

काय व्हायचं होऊ देत, आपल्याला काय त्याच?

आपण बरे आत्मकेंद्रित च्या मायला मरू देत.

दुसरा काय, ज्याचं - त्याच प्रारब्ध

म्हणतांत ना खरं ते खरंच असतं 

लबाडाचं आयुष्य थोडंच असतं 

चालू द्या आपलाच घोड दामटवणं 

रोजचंच मढं, त्याला कोण रडं

  

आतले नि बाहेरचे सारेच न वटलेला चेक आहे 

कसं समजावं, इरादा त्यांचा नेक आहे

कशी कुणा कळत नाही

इथेच ग्यानबाची मेख आहे  

सरकारचं धोरण, भांड्वलदारास शरण  

गरीबच मरण मात्र निश्चित ठरलं  

जातीयतेची तलवार म्यान झाली पाहिजे 

फेक अकाउंट सारी बॅन झाले पाहिजे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy