फौजी....
फौजी....
देशासाठी आयुष्य वाहून देतो
तो फौजी...
रात्र असो किंवा दिवस असो
देशाच्या सीमेवर उभा असतो
तो फौजी...
उन असो पाऊस असो
तरी देशाचे संरक्षण करतो
तो फौजी...
वेळ असो किंवा काळ असतो
लढण्यासाठी सदैव तत्पर असतो
तो फौजी...
सुख असो किंवा दुख असो
घरदार सोडून काळीज घट्ट करतो
तो फौजी...
जगण असो किंवा मरण असो
बंदुकीचा गोळ्या झेलतो
तो फौजी...