STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

पहाट प्रणयाची

पहाट प्रणयाची

1 min
14.7K


अलगद भरला ऊर साजणा

देत श्वासाचा सुस्कारा

प्रीत जडली

रोमारोमात ऊत आला

स्पर्शाचा रात्रीला

मी लाजत किंचित मिटलेले डोळे

झाले मूक अबोल

होऊनि निरागस खट्याळाने

गुंतले कुशीत मन खोल

बट सरिता केसाची

मी नखशिखान्त भिजले

लाजेने बंधन तोडून

मी तुजिया स्पर्शात भिजले

मन अलगद

पळकुटे भित्रे लाजरे

आज आतुरले या आभाससाठी

तू अलगद पाऊल पुढे टाकता

मी मारावी चिंब मिठी

प्रीतीचा स्पर्श सरू नये

प्रणयाचा हा खेळ स्तब्ध व्हावा

अगम्य स्पर्श होत जावा

कास धरून क्षणांची

रात्र सरली तरी संपू नये

ही पहाट प्रणयाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance