फार दूर
फार दूर
पावसात फिरतांना ,
चिखलात फसला पाय
डोळ्यात आले अश्रू ,
आठवायला लागली माय ...
पायात टोचला काटा
सांगू कुणाला आता
काळीज फाटले इथे
समाज मारेल लाथा
आसक्ती भिजण्याची
भिजवले अश्रूंनी गाल
शितल थेंब पावसाचे
वाटे वास्तवाचे ताल
भिजवून मग काया
पाऊस निघून गेला
अर्धा रिकामा होता
ओटीत आता पेला
गंगेच्या प्रवाहापरी
आसवांना आला पुर
उशिरा झाले शहाणी
वाहत आले फार दूर
