STORYMIRROR

Gautam Jagtap

Inspirational Others

3  

Gautam Jagtap

Inspirational Others

पेटती मशाल

पेटती मशाल

1 min
12.3K

माझं जगणं होतं भरकटल्या दुनियेचं

मला कळलंच नाही तो मीच

हताश नजरेचं लक्तर तोडलं मी

घडलो कसा या जीवनात माझा मी

कशी तयार झाली माझ्यात खोल दरी

पेटती मशाल माझ्या अंतरी...(१)


किती बोलावे किती सांगावे मना कळत नव्हते

माझं शांतपणाचं राजच वेगळं होतं

खेळण्यासाठी वेगळेच खेळ मांडत होतो

खेळता खेळता मी तिथेच रमून जातो

किती बदललो माझ्या परी

पेटती मशाल माझ्या अंतरी...(२)


कसा मी पुस्तकी किडा बनलो

तहान भूक कधीच विसरलो

कधी आनंदासाठी गोड शब्दात रंगलो

कधी विचारांती मी साहित्यात रमलो

कशी उमलली माझ्यात गुलमोहरी

पेटती मशाल माझ्या अंतरी...(३)


ध्ययेस्फुर्तीचा ध्यास पेटला उरात

सर्व काही जगतो एकटेपणात

उंच नभाशी गवसणी घालणार अंत:करण

छंद काव्य संगम माझ्या जगण्यातलं स्फुरण

रक्ता रक्तात प्रतिभाशक्ती सर्वत्र संचारी

पेटती मशाल माझ्या अंतरी...(४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational