पेरणी
पेरणी
किती पेरली गं, तास
तासी लागलं वं शेत
शेती उगवलं गं पीक
पीक आलं भरघोस।।धृ।।
भरघोस दाळदान
दाळदान कणग्यात
कणग्या वं उतरंड
उतरंड घरोघर।।१।।
घरोघरी दीवावात
दीवावाती देवादिक
देवादिका आशिर्वाद
आशिर्वाद सजीवास।।२।।
सजीवा पुरण पोळी
पोळी भाजी ती सुग्रास
सुग्रास ती खानावळ
खानावळ धूपवात ।।३।।
धूपवात अन्नपूर्ण
अन्नपूर्ण पूर्ण ब्रम्ह
पूर्ण ब्रम्ह जल देवा
देवा, राशीच्या दे रास।।४।।
