पेराल ते उगवेल
पेराल ते उगवेल
पेराल ते उगवेल
सद्बुद्धी आज दे,
सुजाण नागरिकास
काय केले हे कळू दे!!
धोक्याची घंटा
वाजवी निसर्ग,
उघड आता डोळे
बघ तुझा विसर्ग!!
फटका वादळाचा
तडाखा समुद्रास,
जे तू टाकले यात
तेच देई किनाऱ्यास!!
कचरा शहराचा
गर्भात साठवून,
समूद्र खवळला
रौद्र रूप दाखवून!!
किनार्यावर कचरा
बंद करा टाकण्यास,
उघड आता डोळे
सवयी बदलण्यास!!
