STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

पायवाट....

पायवाट....

1 min
632

थंडगार रेशमी धुक्यात

हरवली आज पायवाट

वेडावले मन माझे

पाहून सृष्टीचा हा थाट....


सोनेरी किरणांच्या सोबतीने

वाहणार्‍या वार्‍यावर झुलायची

हिरवा शालू ल्यालेली पायवाट

रेशमी धुक्यात नहायची......


भरकटलेल्या पावलांना

दिशा देते ही खरी

आज हरवली आहे ती

जावू मी कशी माझ्या घरी?...,.


पावसात चिंब भिजतेय

चुकलेल्यांना वाट दाखवतेय

रणरणत्या उन्हात पोळतेय

दवबिंदुंच्यात आज मी तिला शोधतेय......


गुलाबी थंडी तनूला झोंबतेय

कोवळी सुर्यकिरणे हवी वाटू लागली

आता उगवला नारायण,गेले धुके निसटून

झपझप चाले मी पायवाट नजरेत आली.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational