STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

पायरी ( अभंग रचना )

पायरी ( अभंग रचना )

1 min
664

जन्म तो आनंदी I पायरी पहिली I

वार्ता ती कळाली | आप्तजनी ॥ १ ॥


बालपण सदा | पायरी दुसरी ॥

खेळे गावभरी I सवंगडी ॥ २ ॥


अपेक्षांचे ओझे I पायरी तिसरी I

वाहे भार तरी । खांदयावरी ॥ ३ ॥


खेळ तो संपला I चौथी ही पायरी I

वेळ ना माघारी | फिरण्याची ॥ ४ ॥


प्रत्येक पायरी I अशी आयुष्याची I

सर करायची | क्षणोक्षणी ॥ ५ ॥


जन्म आणि मृत्यू I खेळ तो संसारी |

चूको ना पायरी I कोणतीही ॥ ६ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational