STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

पावसाळी मेघ

पावसाळी मेघ

1 min
221


लेकराचे आगमन

झालो मी रे आता बाप

झाला धन्य माझा जीव

सुख किती हे अमाप


लेकराला वाढविता

माझा बाप आठवला

कुटुंबाच्या भल्यासाठी

किती कष्टला कष्टला


घरी होती दारीद्रयता

कष्ट होते त्याच्या पाठी

रात्रदिन तो राबला

 बोल ममतेचे ओठी


आज पैशासाठी मी ही

सदा व्यस्त हा कामात

लेकरांच्या कल्याणाच्या

फिरे नित्य मी शोधात


संसाराचा गाडा चाले 

बने सारथी हा बाप

सदा करी धडपड

नसे कष्टाला या माप


जगतास हे सांगणे

बाप कुटुंबाचा कणा

घरा येई घरपण

त्याचे महत्व हे जाणा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational