STORYMIRROR

Sayli Kamble

Classics

3  

Sayli Kamble

Classics

पावसाची पहिली सर

पावसाची पहिली सर

1 min
476

आल्या पावसाच्या सरी, तरी पक्षी वेलींवरी

भीरभीर पंख हलवूनी, जणू स्वागतच करी


किती आसुसला जीव, थंड हवेच्या स्पर्शाला

न्हाऊन निघाले मन, नाही माप त्या हर्षाला


किती मोहक दिसे, पावसाचे ते रूपडे

अवचित अंगावर थेंब, शहारले मन वेडे


आकाशाचे तरी किती वर्णावे सौंदर्य

पापणी न हलावी दिसता ढग काळे गर्द


भान ना उरावे मग आसपासच्या जगाचे

अनुभवाया आतुर झाले क्षण प्रतिक्षेचे


मातीचा दरवळ करी परिसर द्विगुणीत

डोळे मिटूनी श्वास घेता हरवले आठवणींत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics