STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

3  

काव्य चकोर

Abstract

पाऊस...

पाऊस...

1 min
337

हिरवळ या झाडांची

भूल पाडते डोळ्यांना..

पावसाचे भिजवणे

खुलवते गं कळ्यांना..!!


सळसळ ही पानांची

नाचवते मयूराला..

स्वप्न हिरवं पडतं

फुलवीत पिसाऱ्याला..!!


तृषा चातकाची वेडी

थेंबभर पाण्यासाठी..

मेघ मल्हार गातसे

पावसाच्या येण्यासाठी..!!


गंध श्वासात भरून

वारा वेडापिसा होतो..

वेल बिलगे झाडाला

देह एकरूप होतो..!!


ऋतू पावसाचा वेडा

तळे मनी साठवतो..

पाऊस सरून जातो

आठवणीत उरतो..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract