STORYMIRROR

Sanket Potphode

Romance

4.7  

Sanket Potphode

Romance

पाऊस

पाऊस

1 min
13.9K


बाहेर कोसळणाऱ्या रिमझिम धारा

मधूनच शहारा देणारा वारा

येणारा ओल्या मातीचा सुगंध

त्यातच जुळलेले आपले भावबंध


बाहेर हा नयनरम्य निसर्ग

आतमध्ये तुझ्या रूपाने स्वर्ग

एक माझ्या लिहिण्याचे साधन

दुसरे माझ्या लिहिण्यामागचे कारण


आपल्या तिघांमधलं हे नातं

आजकालच्या नात्यांपेक्षा खूप वेगळं

एकूणच सगळ्या भौतिकतेच्या पलीकडचं

अगदी चिखलातून उमललेल्या कमळासारखं


पाऊस तर आहे निमित्त

मला कारण हवे फक्त

तुला पाहत राहण्याचे

आणि त्याला शब्दबंध करण्याचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance