पाऊस
पाऊस
*पाऊस आला,पाऊस आला*
*सूऽ सूऽ सूऽ सूऽ वारा सुटला*
*चमचम चमचम वीज चमकली*
*लख्ख पांढराशुभ्र प्रकाश पडला ...*
*ओढ्यात पाणी साचू लागले*
*नदीचे पाणी झुळझुळ वाहे*
*वृक्षवेली चिंब भिजू लागली*
*मुलं सारे हे निरखून हो पाहे*....
*गडगड गडगड ढग बोलले*
*झरझर झरझर पाऊस आला*
*भरभर गारा पडू लागल्या*
*मुलांचा पाण्याशी खेळ रंगला*....
*कागदाची नाव मुलांनी केली*
*पाण्यात ती सोडायले लागले*
*नाव कशी पुढे जाते निरिक्षण केले*
*दिवसभर मुले तिथेच खेळले*.....
