STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

4  

Prashant Shinde

Fantasy

पाऊस..!

पाऊस..!

1 min
519


नभ आले भरुनी अवकाश जड झाले

जणू अवकाशीचे नभांगण खाली आले

लपछपीचा खेळ दावण्या नजरे आड सारे

अच्छादुनि आभाळी लपेटून घेतले


डोकावण्याची कुणा न मुभा

आवरणात सारी भरली सभा

आता येतो नंतर येतो

गुंतली नभाताच सारी मय सभा


नगारे वाजले चौघडे धडाडले

ताशेही कडाडले तालात

ओघळले सारे आले धर्तीवर

क्षणात पागोळीतून ओघळत


तो सूर्य तो चंद्र त्या चांदण्या

नीसटल्या आभाळातून

धारेवर धारा पडता निखळून

आले सारे खाली पाठोपाठ घसरून


पहिला वहिला सुगंध

घेतला साऱ्यांनी भरभरून

राहिले सुगंधित आसमंत

त्या सुगंधाने भरून


कौतुक वाटले मलाही

त्यांच्या त्या हावरे पणाची

खरेच किती अनमोल अशी

किंमत असते पहिल्या पाण्याची....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy