STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

पाऊस घेऊन आला...

पाऊस घेऊन आला...

1 min
0

पाऊस घेऊन आला...

पाऊस घेऊन आला ,
सख्या तुझ्या धुंद लहरी ,
बरसता सर बेधुंद रिमझिम ,
प्रीतीच्या ओल्या सांज प्रहरी ...

ठिबकता थेंब श्वासामध्ये ,
दरवळला मृदगंध ओल्या देही ,
शहारलेल्या पानापानातून ,
ओलावत पापण्या झाल्या स्नेही ,
बरसता सर बेधुंद रिमझिम ,
प्रीतीच्या ओल्या सांज प्रहरी ...
सख्या तुझ्या धुंद लहरी ...

पाऊस घेऊन आला,
सखे तुझी धुंद ओढ वेढावणारी ,
बरसता सर बेधुंद रिमझिम ,
प्रीतीच्या ओल्या सांज प्रहरी...

जणू चांदणं चांदणं देहावरती ,
थेंब थेंब चमकत जाई ,
बट उडता वाऱ्यावरती ,
खळी गुलाबी लाजून जाई ,
बरसता सर बेधुंद रिमझिम ,
प्रीतीच्या ओल्या सांज प्रहरी ,
सखे तुझ्या धुंद लहरी ...

सौ. मनीषा आशिष वांढरे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract