पाऊस गाणी-घन ओंथबून आले
पाऊस गाणी-घन ओंथबून आले


घन ओथंबून आले
घन ओंथबून आले
जल होऊनी बरसले
वृक्ष वेली ही न्हाले
हिरव्या गालीच्यावर
कुशीत येऊनी पहुडले
घन ओथंबून आले
दव होऊनी तृणावर
हळूच ओघळले
गंधाळल्या मातीने
मन मोहून गेले
घन ओथंबून आले
मिठीत धरत्रीच्या
निर्झर स्वच्छंद वाहिले
नदी,सागर, तळी
तुडूंब हे भरले
घन ओथंबून आले
झुळू झुळू वारा वाहे
पिक वा-यावर डुले
सुवास हा फुलांचा
चार दिशास दरवळे
घन ओंथबून आले