पाऊस आठवणी ढग
पाऊस आठवणी ढग
किती शोधू मी शोधू तुला...
किती शोधू मी शोधू तुला...
तू असा पानोपानी ओथंबलेला...
कधी धुमसलेला वेडा...
कधी बरसलेला थोडा...
आला आला ग पाऊस आला...
आला आला ग पाऊस आला...
वेडावणाऱ्या पावसात रान होई चिंब चिंब...
ओढ लावी जीवा मन होई धुंद धुंद...
किती दाटतो मनात...
कधी श्रावणी मेघात...
साथीला भिरभिरं वारा...
आला आला ग पाऊस आला...
दाट आठवांची पागोळी झरझरते...
सावळ्या कृष्ण मेघांची रांगोळी सजते...
दाट आठवांची पागोळी झरझरते...
सावळ्या कृष्ण मेघांची रांगोळी सजते...
कान्हा ढगांवर स्वार ...
देखणा विजेचा थरार...
उन पावसाचा खेळ असा रंगला...
आला आला ग पाऊस आला...
किती शोधू मी शोधू तुला तू असा पानोपानी ओथंबलेला...
किती शोधू मी शोधू तुला तू असा पानोपानी ओथंबलेला...
