STORYMIRROR

Nilesh Jadhav

Abstract Others

3  

Nilesh Jadhav

Abstract Others

पाऊलखुणा..

पाऊलखुणा..

1 min
11.4K

तू यायचीस ना त्या वाटेने भेटायला...

त्या वाटेवरून काल जाताना,

तुझ्या पाऊल खुणा दिसल्या मला.

तू पुन्हा कधी भेटशील असं कधीच वाटलं नव्हतं.

पण तू नव्याने भेटलीस...

क्षणभर मी हरवून गेलो तुझ्या आठवणींमध्ये...

मग जाणवलं त्या वाटेवर विखुरलेला पाचोळा 

माझ्यावरच हसतोय, 

मनातल्या जखमा पुन्हा भळभळू लागल्या आहेत.

त्या रक्तबंबाळ जखमा तशाच ठेवत 

मी तो पाचोळाच पेटवून दिला. 

आणि शिलगु लागली तुझी एक एक आठवण 

त्या जळणाऱ्या पाचोळ्या बरोबर.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract