पाऊलखुणा...
पाऊलखुणा...
आयुष्याच्या या
पाऊलवाटेवर अनेक
पाऊलखुणा उमटतात
काही खोलवर काही वरवर
पण असतात त्या फार कलमी
या पाऊलवाटेवर
अनेक वाटसरू भेटतात
काही आपले होतात काही
आपलेसे करून परके होतात
मात्र त्यांच्या आठवणींच्या
पाऊलखुणा खोलवर
ठसे गिरवुन जातात
मोकळ्या वेळातच काय
क्षणा-क्षणालाही
पापण्या ओलावतात मग
पाऊलवाट असते
आपल्या 'Aim' च्या
मार्गाचा 'Short-Cut'
पण कधी-कधी हा 'Short-Cut'
आयुष्याचा'Long-Cut'होऊन बसतो;
मग आयुष्य पुढे सरत नाही
अन संपतही नाही
शेवटी पाऊलवाट ही वाटते वहिवाट
पाऊलवाटेवर अशा काही
पाऊलखुणांचे ठसे उमटतात की
शेवटपर्यंत त्या खुणा खुणावत राहतात;
आयुष्य कसं जगायचं हे सांगत राहतात
ठेच लागली दगडाने म्हणून
पाऊलवाट बदलायची नसते,
उलट त्याच पाऊलवाटेवर आपल्या “अस्तित्वाच्या पाऊलखुणांचे ठसे" खोलवर ठिकठिकाणी उमटवत जायचं
जगाचाही निरोप घेतानाही
अशा पाऊलखुणांचे
ठसे ठेवून जायचं, की
मागच्या येणाऱ्यानंही त्या
पाऊलखुणांवर पाऊल ठेवून नव्यानं पाऊलखुणांचे ठसे उमटावेत
असं काहीतरी करून जायचं असतं...
