पारा पहारा
पारा पहारा
पारावर बसून पहारा देत
गप्पा रंगवून चहा घेत
येणारे जाणारे सारे मोजत
हर एकाची न्यारी रंगत
तोच, हीच, हाच म्हणत
कुणकुण अनोळखी अचंबित करत
रात्र उलटली वाट बघत
सावल्या मात्र एकमेकांशी खेळत
कंटाळून पुन्हा जेव्हा जमत
निवांत बसती पत्ते खेळत
