STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Others

2  

Rajesh Sabale

Tragedy Others

।।पाण्याचा शोध।।

।।पाण्याचा शोध।।

1 min
2.8K


नका घालू वेळ वाया, या सरकारी पाणी योजनेसाठी।

पाणी अडवा पाणी जिरवा, आपुल्या जगण्यासाठी।।

 

नाही लावला शोध मानवा तू, माणूस जगवण्यासाठी।

वणवण फिरावे लागेल जेंव्हा, पाण्याच्या थेंबासाठी।।

अवकाशामध्ये किती बांधल्या, शाळा कुणाच्यासाठी।

कशाला करता उगाच गप्पा, अवकाश गमनासाठी।।

 

काय त्याचा उपयोग जगाला, जीवन जगण्यासाठी।

रोज मारतो माणूस माणसा, आपल्या स्वार्थासाठी।।

वणवण उगाच फिरते उन्हात, जनतापाण्यासाठी।

अणुशक्तीच्या जोरावरती, पाणी शोधा की जनतेसाठी।।

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy