STORYMIRROR

Pandit Warade

Classics Others

3  

Pandit Warade

Classics Others

पाणी

पाणी

1 min
184


उपयोग काय झाला

पाणी असून उशाला

थेंब एकही मिळेना

पडे कोरड घशाला


एका एका थेंबासाठी

किती चाले आटापिटा

मैलभर  चालतांना

थकल्यात पायवाटा


एकावर एक हंडे

तीन तीन डोईवर

एकमेव कार्यक्रम

चालतसे दिसभर


पाणी होते मुबलक

नाही सांभाळता आले

तांब्याभर जेथे लागे

हंडाभर  रिचवले


रक्त इतुके हे स्वस्त

कसे अन् कधी झाले?

घोटभर पाण्यासाठी

पाट रक्ताचे वाहिले


पाण्यासाठी नित्य येथे

डोके फोडाफोडी चाले

कंटाळून भांडणाला

पाणी लपून बसले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics