STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

पानं पान

पानं पान

1 min
448

पानं पान


बळजबरीनेच माझी

ह्या नविन खोलीत

रवानगी झाली होती


जुने माझे काही 

पुस्तक मित्रे 

होते सोबती


आजुबाजुला होती 

'खाटे' वरती 

राहणारी पाच सहा जण


छोट्याच या खोलीत

कमीत कमी गरजेच्या 

'वॉकर' सारख्या होत्या काही गोष्टी


लहरीपणा हा पावसाचा

एकदा न कळत शिरला

आमच्या ह्या महाली


धावपळ एकच झाली

आम्हा वाचवण्याची

त्या मालकाची


मला वाचवताना

मी ओरडत तळमळत होतो

माझ्या पुस्तक मित्रांसाठी


आवाज माझा विरला

दुसऱ्या खाटेवरती

सुरक्षीत हलवले आम्हाला


आमच्या त्या खोलीत आता

पावसाचे पाणी 

ओसरत होते हळुहळू


लांबुनच पाहिले

पाण्या वर तरंगत होत्या खाटा, वॉकर आणि

माझ्या पुस्तक मित्रांचे वेगळे झालेले पानंन पानं


व्यथित मनाने पहात राहीलो

माझ्या पुस्तक मित्रांचे तरंगते

'पानं पान'


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy