STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

पानगळ

पानगळ

1 min
288

पानगळ ती सरता सरता

वसंत येई नवचैतन्य पांघरून

निमिषार्धात होऊन पाचोळा,

मोहमायेचा पाश तो सोडवून.


पानगळ निराशेची मावळता,

येई स्वप्नपूर्तीची संधी उजळून.

दृढ निश्चयाची कास ती धरून,

शांत, मृदगंध,सृजनाचे बीज पेरून.


तारूण्य सरे नोकरची वाट शोधत,

पानगळीत सजे, मधुचंद्राचा घाट.

चैतन्यात बहरे दैवयोगे वहिवाट,

दोघांच्या मिलना आतुर रम्यपहाट.


संघर्षमय लाटा निमिष झेलत,

झाड अस्तित्व टिकवत बहरत.

परिवर्तनाच्या समृध्दीत लहरत,

नश्वर देहास जगणे ते शिकवत


शिशिर,वसंत खेळ पाठशिवणीचा,

स्वयंभु जगे छेदून चक्रव्यूह जाळ,

आयुष्यातील संघर्षाचा बसवे मेळ.

सौंदर्य कळ्यांची येत सोनेरी सकाळ.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational