STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

पांग...!

पांग...!

1 min
111

दिल्या घेतल्या स्वप्नांची

शपत तुला आहे

सहज सुंदर गाणं

कानावर आलं...


आणि एक एक धागा

नात्याच्या उलगडत गेला

सारा संस्काराचा डोलारा

कोलमडून पडला..


म्हंटले काय हे दिवस

सर्रकन सरकले

होत्याचे नव्हते पहा

क्षणात कसे झाले...


पूर्वीचा मान अपमान

बास्तनात जाऊन बसला

व्यवहारिक जगताने

सहजच नात्यांचा ताबा घेतला....


बाप म्हणून आनंदाने

मुलाला शाळेत हौसेने सोडले

मुलगा शिकला सावरला आणि

त्याने मलाच वृद्धाश्रमात धाडला...


तेंव्हा त्याला मी क्रूर वाटलो

पण जन्मभर त्याच्यासाठी झटलो

आता मात्र त्याने खरे पांग फेडले

त्राग्यातच हौसेने हात झटकले...


बरे वाटले मला आजही

त्यांना मोकळे करताना

उतार वयातल्या संध्यासमयी

आश्रमाचा मार्ग धरताना......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational